भोर तालुक्यात ४५ तर; नसरापूरमध्ये चार बाधीत

भोर तालुक्यात ४५ तर; नसरापूरमध्ये चार बाधीत

नसरापूर ता. ८ : भोर तालुक्यात गेल्या चारच दिवसांत कोरोना बाधितांची संख्या आता ४५ वर पोहचली आहे. नसरापूरमध्ये एकाच दिवसात ४ जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, शुक्रवारी या एकाच दिवसात १९ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या चारच दिवसात तालुक्यात एकूण बाधित ४५ आढळले आहेत.
गेल्या आठभरात भोर शहर, उत्रोली, बाजारवाडी, नेरे, वेनवडी, राजापूर, न्हावी १५, सारोळा, सांगवी, शिंदेवाडी, पांडे, कुसगाव, कोर्ले, किवत, हातवे खुर्द, कासुर्डी गुमा, गवडी, पोंबर्डी, वरोडी या गावात कोरीना बाधित मिळून आले आहे. तसेच हवेली तालुक्यातील खेडशिवापूर परिसरातील गावात कोरोना बाधिताची आकडेवारी वाढत असल्याचे समोर येत आहे. बाधितावर भोर येथील उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटर आणि खासगी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत.
भोर तालुक्यात दररोज रुग्ण सापडू लागल्याने तहसीलदार सचिन पाटील यांनी नागरिकांनी तालुक्यात लागू केलेल्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना बाधित संपर्कातील ग्रामस्थांवर प्रशासन लक्ष ठेवुन असून कोणास त्रास झाल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com