शिवरीतील जागा संस्थेस नियमानुसार
sakal

शिवरीतील जागा संस्थेस नियमानुसार

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा व विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक

नसरापूर, ता. २५ : शिवरे (ता. भोर) येथे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीस नियमानुसार जागा दिली असून, याबाबत विशेष ग्रामसभेने बहुमताने ठराव मंजूर केला आहे. या ग्रामसभेची ध्वनिचित्रफीत वरिष्ठ कार्यालयाला सादर केली आहे. त्यामध्ये कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नाही, असे स्पष्टीकरण शिवरे येथील उपसरपंच सूर्यकांत पायगुडे व काही ग्रामस्थांनी दिले.
शिवरे येथे शिवभूमी शिक्षण संस्थेच्या शाळेची इमारत बांधण्यासाठी सन २०१८ मध्ये शिवरे ग्रामपंचायतीने स्वतःच्या मालकीची ३ गुंठे जागा भाडेतत्वावर दिली आहे. हा भाडेकरार शासकीय नियम व अटींचे उल्लंघन करून झाला असल्याबाबत काही नागरीकांनी हरकत घेत पंचायत समिती व जिल्हा परिषदेत तक्रार केली आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल सरपंच अमृता संदीप गायकवाड व उपसरपंच पायगुडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, याबाबत राजकीय हेतुने तक्रार केली जात असून, यामधील तक्रारदारांनीच २८ मे १९९० मध्ये सरपंच असताना शिवभूमी शिक्षण मंडळास ३० गुंठे जागा हस्तांतर करण्याबाबतचा ठराव दिलेला आहे. तसेच, या पूर्वीही शैक्षणिक कार्यासाठी शिवभूमी शिक्षण संस्थेस जागा देण्याबाबत आतापर्यंत तीन विशेष ग्रामसभा होऊन त्यामध्ये मान्यता दिली आहे. आता नुकतीच २७ डिसेंबर २०२१ रोजी शासनाच्या निकषाप्रमाणे पूर्वपरवानगी घेऊन विशेष ग्रामसभा झाली. त्यामध्ये गट क्र ११४ मधील ३ गुंठे क्षेत्र शिवभूमी शिक्षण मंडळास हस्तांतरित करण्याचा ठराव उपस्थित २७१ ग्रामस्थांपैकी २५७ ग्रामस्थांनी हात वर करून मंजूर केला आहे. याचे संपूर्ण चित्रीकरण केलेले असून, ते व ग्रामसभेचे प्रोसिडिंग गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे. ही ग्रामसभा खोटी ठरवण्यासाठी तक्रारदार कोऱ्या कागदावर ग्रामस्थांच्या सह्या घेत आहेत.
या वेळी सोपान श्रीपती डिंबळे, ज्ञानोबा बहिर्जी डिंबळे, गणपत कान्हू डिंबळे, लक्ष्मण निवृत्ती डिंबळे, रामचंद्र गुलाब डिंबळे, बाळासाहेब शेडगे, नाना डिंबळे, बाळासाहेब धुमाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवरीतील जागा संस्थेस नियमानुसार
बीड : अखेर सोलापूरवाडी ते कडा पर्यंत धावली रेल्वे

त्यानुसार पोलिसांनी मळवली देवले रस्त्यावर सापळा रचून प्रशांत आंबेकर याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. पिस्तूलाबाबत विचारले असता त्याने अनिकेत कालेकर याने हे पिस्तूल दिले असल्याची माहिती दिली. दोघांना वडगाव मावळ न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. १) पोलिस कोठडी सुनावली आहे.(Wadgaon Maval court has remanded them in police custody till Saturday)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com