फुलगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
फुलगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

फुलगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

आळंदी, ता. १३ : फूलगाव (ता. हवेली) येथे शेतकऱ्यांना ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी पाचटाची कुटी करून कुजण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यामुळे ऊस पिकासाठी एकरी २० टक्के खताची गरज भागवली जाते. यावेळी मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे, कृषी सहायक अर्चना मोरे, सरपंच मंदाकिनी मागस्कर, राहुल वागस्कर, संपत वागस्कर, जयदेव भंडारे, भाऊ साकोरे, मारुती खुळे, विठ्ठल खुळे, गोकूळ साकोरे, मोरेश्वर साकोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top