‘आळंदीत अतिक्रमण कारवाई करावी’

‘आळंदीत अतिक्रमण कारवाई करावी’
Published on

आळंदी, ता. १५ : राज्यतिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीतील रस्ते रुंद केले. मात्र, शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणात वाढ झाल्याने विस्कळितपणा वाढला. मुख्याधिकारी आणि प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशा सूचना आमदार दिलीप मोहिते यांनी सोमवारी (ता. १४) आळंदीत झालेल्या जाहीर सभेत पालिकेला दिल्या.
शहरातील विविध रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मावती रस्ता येथे जाहीर सभेवेळी आमदार मोहिते बोलत होते. शहरातील विकासकामांची पाहणी करत असताना विविध ठिकाणी राज्यमंत्री भरणे आणि मोहिते यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांना वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणांचा सामना करावा लागला.
यावेळी मोहिते म्हणाले, ‘‘आळंदीच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक विकासाची कामे आणली. भविष्यातही अशाच पद्धतीने विकासकामे केली जातील. मात्र, आळंदीत आल्यावर रस्ते होवूनही वाहतूक समस्या जाणवत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com