भांबर्डे येथे युवकावर
बिबट्याकडून हल्ला

भांबर्डे येथे युवकावर बिबट्याकडून हल्ला

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : भांबर्डे (ता. शिरूर) येथे रांजणगाव गणपती-भांबर्डे रस्त्यावर बिबट्याने युवकावर हल्ला केला.
करण संकपाळ हा युवक बुधवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी भांबर्डे येथे संजय पवार यांच्या शेताच्या कडेला उभ्या असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात दुचाकीला पाठीमागून बिबट्याचा स्पर्श झाला. त्यावेळी करण याने गाडी जोरात पळविल्यामुळे सुदैवाने तो बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून येथील परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. वनविभागाने त्वरित परिसराची स्थळ पाहणी करून बिबट्याची दहशत बंद करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com