तंत्रज्ञानाने शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात क्रांती : पलांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रज्ञानाने शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात क्रांती : पलांडे
करंजविहिरे शाळेत शालेय साहित्याचे वाटप

तंत्रज्ञानाने शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात क्रांती : पलांडे

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २७ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिरामध्ये शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियम पाळून दहावी व बारावीचे विद्यार्थी व शिक्षकांनी मोजक्या नागरिकांसह प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी सरपंच महेंद्र रणसिंग, पोलिस पाटील किरण काळे, संस्थेचे पदाधिकारी, संचालक व शिक्षक उपस्थित होते.
‘‘तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात आणलेल्या संगणकाच्या नवीन तंत्रज्ञानाचा आता आपल्या देशात वटवृक्ष झाला असून, नवीन तंत्रज्ञानाने शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात क्रांती झाली आहे. नवीन तंत्राचा सर्वांनीच स्वीकार केला पाहिजे. स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणीही अशिक्षित राहू नये.’’ असे आवाहन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top