वराळेत वीज बचतीसाठी सौर दिवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराळेत वीज बचतीसाठी सौर दिवे
वराळेत वीज बचतीसाठी सौर दिवे

वराळेत वीज बचतीसाठी सौर दिवे

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १० : वराळे (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी सौर दिवे लावून सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी मूलभूत पाऊल उचलले आहे. या उपक्रमात जुने दिवे सौर दिव्यात बदलणे आणि नवीन सौर दिवे बसविणे याचा समावेश आहे.
यावेळी नवीन १२ दिवे बसविणे आणि अन्य १२ ठिकाणी जुने दिवे नवीन सौर दिव्याच्या स्वरूपात बदलण्यात आले. येथील गावठाण, कोरेगाव रस्ता वस्ती, ठाकरवाडी आदी ठिकाणी हे दिवे बसविण्यात आले.
या कामाचा प्रारंभ करताना सरपंच दिनेश लांडगे, उपसरपंच सुनीता ठाकर, ग्रामपंचायत सदस्या पूजा बुट्टेपाटील, अविनाश लोंढे, उज्ज्वला चव्हाण, शुभांगी बुट्टेपाटील, बाळासाहेब ठाकर, ग्रामसेवक विकास विसे यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top