गांधीजींचे विचार जगाला प्रेरणादायी
तळेगाव ढमढेरे, ता.३१ : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आजही जगाला प्रेरणादायी असून, सत्य व अहिंसा ही तत्वे सर्वांनी अंगिकारल्यास लोकशाही अधिक प्रबळ होईल, असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखातर्फे महात्मा गांधीजींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी पलांडे यांच्या हस्ते पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिक्षण संस्थेच्या निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, सरदवाडी, निर्वी व शिरूर येथील शाखांतर्फे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त २ मिनिट उभा राहून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम चव्हाण, प्राचार्य दिलीप पवार, तंत्रस्नेही शिक्षक महेश शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक अर्जुन चव्हाण, रमेश वाळके, शोभा भोसले, लता चव्हाण, सुनीता करपे, गणेश खेडकर व संस्थेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
पलांडे पुढे म्हणाले की, शिक्षकांनी महात्मा गांधीजींच्या विचारांची शिदोरी अखंडितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी. गांधीजींनी सांगितलेली नीतिमूल्ये विद्यार्थी व समाजात रुजवावीत, शासनाच्या धोरणानुसार शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून विद्यार्थ्यांचा व शिक्षण संस्थेचा दर्जा व गुणवत्ता वाढवावी.
संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.छाया लोंढे यांनी आभार मानले.
02866
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.