रांजणगाव ते सोनेसांगवी रस्त्याचे काम लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव ते सोनेसांगवी रस्त्याचे काम लवकरच
रांजणगाव ते सोनेसांगवी रस्त्याचे काम लवकरच

रांजणगाव ते सोनेसांगवी रस्त्याचे काम लवकरच

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. ६ : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गातील रांजणगाव गणपती ते सोनेसांगवी या गावांना जोडणारा रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. वारंवार या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी नागरिक, प्रवासी, भाविक व पर्यटकांकडून होत आहे. तत्काळ या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे. याबाबत गृहमंत्री दिलीप
वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली असून तत्काळ हे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती देवस्थानला भेट देण्यासाठी राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यातून निधी अभावी ह्या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. त्यामुळे पुणे येथे तत्काळ बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, चव्हाण, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, सदानंद कुलकर्णी, आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर उपस्थित होते,
दरम्यान, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती सुभाष मोरमारे, सभापती संजय गवारी, विश्वास कोहकडे, संतोष भोर, नंदकुमार सोनावले, मंदार पाचुंदकर, प्रताप पाचुंदकर, संदीप गवारी आदी उपस्थित होते. ही दिनदर्शिका घराघरापर्यंत
पोहचविण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती पाचुंदकर यांनी दिली.

02684

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top