आरोग्य विभागाकडून लसीकरणावर भर : सातव

आरोग्य विभागाकडून लसीकरणावर भर : सातव

रांजणगाव गणपती, ता. ९ : आजार आटोक्यात येण्यासाठी आरोग्य विभागाच्या साथीने व नागरिकांच्या कर्तव्यदक्षतेनी पळवून घालवता येते. परंतु गोळ्या आणि औषधांसोबतच नागरिकांनी नियमांचे पालन करणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. कोरोना हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून अधिकाअधिक लसीकरण करण्याकडे भर दिला जात आहे. नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकारी डॅा. महेश सातव यांनी केले आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सातव यांनी सांगितले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
02704

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com