भामा आसखेड धरणा मध्ये सध्या ५८ टक्के पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhama askhed dam
तळेगाव ढमढेरे येथे दुय्यम निबंधक कार्यालयासाठी जागा पाहणी

भामा आसखेड धरणा मध्ये सध्या ५८ टक्के पाणीसाठा

आंबेठाण : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सुरू असून सलग अकराव्या दिवशी नदीपात्रात विसर्ग सुरूच आहे. सध्या तरी आलेगाव पागापर्यंत असणारे बंधारे भरण्यासाठी एक हजार क्युसेक वेगाने पाणी धरणाच्या आयसीपीओमधून भामा नदीपात्रात सोडले जात आहे. भामा आसखेड धरण जलाशयात सध्या ४.९२ टीएमसी म्हणजे ५८.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले धरण आहे. चालू वर्षातील उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन पाच एप्रिलपासून सुरू करण्यात आले असून धरणाच्या आयसीपीओमधून हा विसर्ग सुरू आहे. सुरुवातीला ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यात वाढ करून हा विसर्ग १००० पर्यंत नेण्यात आला आहे.

चालू वर्षी धरण क्षेत्रात १ हजार ११४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण ४.९२ टीएमसी इतका पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा हा ४.४४ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ५४. ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
सध्या तरी आलेगाव पागापर्यंत असणारे बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्रात पाणी खळखळत असल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांमधून आणि या पाण्यावर पाणी योजना अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या जरी धरणात ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक दिसत असला तरी अजून कडक उन्हाळ्याचे दोन महिने बाकी आहेत. याशिवाय धरणातील काही पाणी पुणे शहराला जात असून त्यांचा राखीव कोठा आहे. तर काही पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १९ गावे आणि इंडस्ट्रिअल असोसिएशन या योजनेला देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top