ओतूर येथे ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा

ओतूर येथे ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा
Published on

ओतूर, ता. २३ : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय व पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या वतीने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ एकदिवसीय आयोजित कार्यशाळेत १३७ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. शिंदे व विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ. एस. एस. लंगडे यांनी दिली.
या कार्यशाळेत स्त्रियांचे स्वास्थ्य, विवाहपूर्व समुपदेशन, कराटे प्रशिक्षण अशा विविध विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. प्राची सुतार यांनी स्त्रियांचे आरोग्यावर मार्गदर्शन करताना मुलींनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच, सकस आहार, सभोवतालची स्वच्छता, करमणुकीची साधने, व्यायाम व विश्रांती, नोकरीतील ताणतणाव, योग्य पर्यावरण इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण केले. विद्यार्थिनींनी मैदानी खेळ खेळावे, असे आवाहन केले. डॉ. रश्मी घोलप यांनी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. लग्नासाठी जोडीदार कसा निवडावा या संबंधित बोलताना त्यांनी जोडीदाराची बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक आरोग्य या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. जुन्नर येथील किरण जायकर यांनी ‘कराटे प्रशिक्षण काळाची गरज’ या विषयाबद्दल माहिती दिली. यावेळी किरण जायकर व धनश्री जायकर यांनी कराटे प्रात्यक्षिके करून दाखवताना २० हॅण्ड टेक्निक्स विद्यार्थिनींना शिकविल्या. यामध्ये नेहमीची वापरातील वस्तू जसे की हेअर क्लिप, पेन, पर्स, सॅक याच्या मदतीने संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले.
उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे यांनी विद्यार्थिनींना आत्मनिर्भर बनण्याचा संदेश दिला. यावेळी डॉ. एन. एच. हांडे, डॉ. यू. पी. पनेरू, डॉ. व्ही. वाय. गावडे, डॉ. व्ही. डी. कुंडलिक, डॉ. एच. एम. बोराटे, विश्वास डुंबरे, मिलिंद ढगे, डॉ. छाया तांबे सचिन डुंबरे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. व्ही. एम. शिंदे व उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस. एस. लंगडे यांनी सूत्रसंचालन; तर, मीरा नायकोडी या विद्यार्थिनीने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dignitaries and alumni perform tree plantation at Belhe under the Belheshwar Ashirwad Vruksha Abhiyan.
young girl kidnapping
Beneficiaries government schemes
Nirgudsar Road Potholes
Marathi News Esakal
www.esakal.com