''वाघिरे''मध्ये भाषा स्वाक्षरी मोहीम

''वाघिरे''मध्ये भाषा स्वाक्षरी मोहीम
Published on: 

ओतूर, ता. १ : येथील (ता.जुन्नर) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ''मराठी भाषा गौरव दिन'' विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये ''भाषा स्वाक्षरी मोहीम'' या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे यांनी दिली.
या मोहिमेत पहिल्याच दिवशी १५८ विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.तसेच प्रसिद्ध लेखक, कवी व गझलकार प्रा.जयसिंग गाडेकर यांचे ''मराठी भाषेचे संवर्धन'''' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले "मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार आजच्या विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. मराठीतील ज्ञानाचा ठेवा दुसऱ्या भाषेत अनुवादित केला पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील शब्दांना आपण पारिभाषिक संज्ञा तयार केल्या पाहिजेत. मराठी भाषेत ज्ञानरूपी अमृताचा कुंभ भरलेला आहे. आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा जास्तीत जास्त जगभर पोहोचवण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. मराठी भाषेतील ज्ञानाचे भांडार जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली पाहिजे.

प्रा. डॉ.वसंत गावडे म्हणाले, की मराठी भाषेला जगामध्ये एक महत्त्वपूर्ण दर्जा आहे. मराठीच्या बोलींनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे आहे. मातृभाषा हे संस्काराचे विद्यापीठ आहे. मराठी भाषा ही अभिजात आणि माझ्या मते मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे.

अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य डॉ .एस. एफ.ढाकणे म्हणाले," मराठी भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली अनेक उदाहरणे आहेत. त्या थोर व्यक्तिमत्त्वांनी इंग्रजी भाषेचा आग्रह कधीही धरला नाही. आपल्या यशामध्ये मराठी माध्यम कधीही आड आले नाही .यशस्वी होण्यामध्ये मातृभाषेचा आणि मराठी भाषेच्या माध्यमाचा कोणत्याही प्रकारे अडसर येत नाही."
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एम. शिंदे व उपप्राचार्य डॉ.के.डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनील लंगडे, डॉ.भूषण वायकर, डॉ.रमेश काशीदे,डॉ. नंदकिशोर उगले, प्रा.जनार्दन नाडेकर उपस्थित होते. प्रा.रोहिणी मदने यांनी सूत्रसंचालन व डॉ. छाया तांबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mulshi taluka continue paddy harvesting amid drought concerns and reduced crop prospects.
Sewage treatment plants under construction as part of Pune's Mula-Mutha river pollution control project.
Police seized 110 drug-misuse-prone injection bottles and arrested four suspects in Baramati.
Maharashtra increases MD and MS postgraduate medical seats by 1,066 across government and private colleges.