आदित्य सातव यास बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय गुणांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य सातव यास बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय गुणांकन
आदित्य सातव यास बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय गुणांकन

आदित्य सातव यास बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय गुणांकन

sakal_logo
By

दौंड, ता. ३ : आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने (फिडे) जाहीर केलेल्या क्रमवारीत दौंडमधील आदित्य अमोल सातव या बारा वर्षीय विद्यार्थ्याचा आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीत समावेश झाला आहे.
पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धीबळ स्पर्धेत आदित्य सातव याने हे यश संपादित केले आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेसच्या (फिडे) गुणांकनानुसार आदित्य याच्या नावावर सध्या १२४३ इलो गुणांची तसेच रॅपिड गटातील १०४१ इलो गुणांची नोंद आहे. जागतिक क्रमवारीत त्याचा क्रम १२६३२७ असून राष्ट्रीय क्रमवारीत त्याचा क्रम ३०९१ इतका आहे.
दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन हायस्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकणारा आदित्य हा दौंडमधील किशोरवयीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आदित्यचे वडील कुरकुंभ येथे एका खासगी कंपनीत नोकरी करीत असून आई राज्य राखीव पोलिस दलाच्या बिनतारी संदेश विभागात पोलिस हवालदार पदावर कार्यरत आहे.
‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराचे मानकरी जयंत गोखले व बुद्धीबळ प्रशिक्षक राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवत असलेल्या आदित्यने लहान वयातच या खेळाशी मैत्री केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top