श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

ओतूर, ता. ८ ः खामुंडी (ता. जुन्नर) येथे श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने श्रमसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खामुंडीचे सरपंच वनराज शिंगोटे, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सोपान कोकाटे, देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष संदीप गंभीर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.यु. खरात ग्रामपंचायत सदस्य सत्यवान डुंबरे, दत्तू बोडके, जनार्दन बोडके, ज्ञानेश्वर कोकाटे, पांडुरंग कोकाटे हे उपस्थित होते.
या शिबिर कालावधीत काळभैरव मंदिर परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसर स्वच्छता करण्यात आला.
तसेच गावातील झाडांना आळे करून पाणी दिले. प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. एकांकिका, लोक नृत्य, पथनाट्य असे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाद्वारे गावात समाज प्रबोधन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संगणक विभागप्रमुख प्रा. सुनील खताळ, ई अँड टीसी विभागप्रमुख प्रा. महेश चिंचोले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. सचिन जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. स्वप्नील डुंबरे, प्रा. रुद्राणी कौळखेरे व ग्रंथपाल शामराव बढे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com