दौंडमध्ये ज्वारी २५०० रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये ज्वारी २५०० रुपये क्विंटल
बेल्ह्यात व्याख्यानाचे आयोजन

दौंडमध्ये ज्वारी २५०० रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. १३ : दौंड तालुक्यात ज्वारीची २४७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान १३५० रुपये; तर कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटल, असा असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची १५७ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १३०० व कमाल २५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुक्यात दौंड येथील मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारात लिलाव सुरू आहेत. दौंड मुख्य बाजारात फळे आणि पालेभाज्यांची आवक घटली असून, बाजारभावात वाढ आहे. केडगाव उपबाजारात गहू, ज्वारी व बाजरीची आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत होते.
फ्लॅावरची ३३० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान ३०० रुपये; तर कमाल ५०० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ५०० आणि मेथीस शेकडा किमान ८०० व कमाल १२०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. लिंबाची १३५ डागांची आवक झाली असून, त्यास प्रतिडाग किमान १५१; तर कमाल ५०५ रुपये, असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो- २५०, वांगी- ८००, दोडका- ६००, भेंडी- ८००, कारली- ६००, हिरवी मिरची- ६००, गवार- ८००, भोपळा- ३००, काकडी- १५०, शिमला मिरची- ६००, कोबी- २५०.

शेतमालाची आवक (क्विंटल) व बाजारभाव (रुपये)
शेतमाल आवक किमान कमाल
कांदा ०८९१ ०८०० ३५००
गहू ११०२ १७०० २३५१
तूर ००९१ ४८५० ५६५०
बाजरी ०३९२ १७०० २३०१
हरभरा ००३१ ३८५० ४५०१
मका ००२८ १५०० १७५०

----

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top