दौंडमधील गव्यांची शोधमोहिम निष्फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील गव्यांची शोधमोहिम निष्फळ
खिलार जातीच्या वासरांना मागणी

दौंडमधील गव्यांची शोधमोहिम निष्फळ

sakal_logo
By

दौंड, ता. १२ : शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) मुख्यालयात दिसलेल्या रानगव्यांच्या शोध लागलेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी वन विभागाची शोधमोहिम निष्फळ ठरली.
दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक पाच मुख्यालयात मंगळवारी (ता. ११) रात्री गव्यांची एक जोडी आढळून आली होती. गट क्रमांक पाचच्या जॅागिंग ट्रॅकवरून गटाचे समादेशक तथा पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या शासकीय निवासस्थानाजळ आली होती. कर्तव्यावरील पोलिसांनी गव्यांना न हटकल्याने ते पुढे निघून गेले. परंतु, ते नेमके कोठून गेले याची माहिती नसल्याने बुधवारी शोधमोहिम राबविण्यात आली. गुरुवारी (ता. १३) मेरगळवाडी (ता. दौंड), एसआरपीएफ गट क्रमांक सात व पाच परिसरात शोधमोहिम राबविण्यात आली. परंतु, गवे आढळून आले नाही.
दरम्यान, एसआरपीएफ कार्यालये व वसाहतीमधील कुटुंबांना विनाकारण बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. गवे आढळल्यास नियंत्रण कक्ष आणि वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती गट क्रमांक सातचे पोलिस निरीक्षक सचिन डहाळे यांनी दिली.
नागरिकांनी गवे दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी रवी मगर यांनी केले.

बिबट्याचा ठावठिकाणा नाही
बिबट्याने १ सप्टेंबर २०२० रोजी एका दौंड शहराजवळ मंगेश मेमोरिअल शाळेसमोर मेंढपाळाच्या एका कुत्र्याचा फडशा पाडल्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक सातच्या पोलिस वसाहतीमध्ये प्रवेश केला होता. बिबट्याचे ठसे आढळल्याने वन विभागाकडून शोधमोहिम राबविण्यात आली होती, परंतु अद्यापपर्यंत त्या बिबट्याचा शोध लागलेला नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top