दौंड शुगरमध्ये चोरी, एकजण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड शुगरमध्ये चोरी, एकजण ताब्यात
दौंड शुगरमध्ये चोरी, एकजण ताब्यात

दौंड शुगरमध्ये चोरी, एकजण ताब्यात

sakal_logo
By

दौंड , ता. २३ : दौंड शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात चोरी केल्याप्रकरणी एका कंत्राटी कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
दौंड पोलिसांनी आज याबाबत माहिती दिली. आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर लिमिटेड मधील वर्कशॅाप मधून २३ एप्रिल रोजी पहाटे एका इसमाने वेल्डिंग केबल, गन मेटल बार व गन मेटल रिंग चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले. सदर प्रकार दुपारी लक्षात आल्यानंतर चौकशीअंती सदर चोरी सुनील अजय चौहान (सध्या रा. लेबर कॅालनी, दौंड शुगर लिमिटेड, मूळ रा. कबीरपूर, बिहार) या कंत्राटी कामगाराने केल्याचे निष्पन्न झाले. चोरीस गेलेल्या मालाचे मूल्य साडेनऊ हजार रुपये इतके आहे. याबाबत कारखान्याचे सुरक्षारक्षक उद्धव काशिनाथ कापसे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top