

टाकळी हाजी, ता. २५ : निनादणारे सनई, ताशा संबळाचे वाद्य... त्या तालावर निघालेल्या पालख्या, काठी... कुकडी नदीवरील कुंड पर्यटनस्थळी असणाऱ्या दोन्ही मळगंगा देवीच्या दर्शनासाठी झुलत्या पुलावर भाविकांची गर्दी... त्यातच ''श्री मळाबाई छाती की जय''च्या जयघोषाने पुणे-नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या कुकडी नदीवरील श्री मळगंगा देवी यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी व पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मळगंगा देवीची यात्रा कालाष्टमीला भरते. कुलदैवत असल्याने राज्यातून सुमारे लाखो भाविक या यात्रेसाठी गर्दी करताना दिसतात. या वर्षी शनिवार (ता. २३) या यात्रेस सुरुवात झाली. या दिवशी टाकळी हाजी आणि निघोज या दोन्ही गावात डोल ताशांच्या गजरात काठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. निघोज येथे रात्री बारवेतून निघालेल्या घागरीची मिरवणूक काढली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. रविवार (ता. २४) निघोज गावात घागर व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. घागरीचे बारवेत विसर्जन करण्यात आल्यानंतर कुंड पर्यटन स्थळावर यात्रेला प्रारंभ करण्यात आला. याच दिवशी टाकळी हाजी ग्रामस्थांच्या वतीने कुंड पर्यटन स्थळावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. दोन्ही श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी बांधलेल्या झुलत्या पुलाचा वापर भाविकांनी करून दर्शन घेतले. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी बंदोबस्त ठेवला होता. रात्री विद्युत रोषणाई व छबिना व लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले होते.
पाटबंधारे विभागाकडून स्नानासाठी सोडले पाणी
पाटबंधारे विभागाने कुकडी नदीला पाणी सोडल्यामुळे भाविकांना स्नान करण्याची सोय झाली होती. या काळात कुंड पर्यटन स्थळात पाण्याचे धबधबे वाहू लागले होते. या काळात कुंडामध्ये घसरण तयार होऊन पाण्यात पडण्याची शक्यता असल्याने भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन मंदिर परिसरात असणाऱ्या ध्वनीप्रक्षेपावरून सांगितले जात होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
03139
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.