चाकणला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
चाकणला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

चाकणला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

sakal_logo
By

चाकण, ता. ३१ : येथील पुणे-नाशिक महामार्गावरील प्रज्ञेश रेसिडेन्सी येथील मंदिरात श्री गणेश, गुरुदेव दत्तात्रेय, रंगनाथ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा, विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने उत्साहात झाला, अशी माहिती डॉ. सचिन निकम यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिरवणूक, होमहवन, सुप्रिया साठे-ठाकूर यांचे प्रवचन व ब्रम्हमूर्ती ज्ञानेश्‍वर माऊलींचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच, मंदिराचे कलशारोहण झाले. यावेळी माजी सभापती भगवान पोखरकर, हनुमंत जठार, नाशिकचे संजय दुसाने, निवृत्ती दुसाने, दाभाडीचे दाजीकाका निकम, मंचरचे गोविंद खिलारी, डॉ. सचिन निकम, डॉ. नम्रता निकम, चारुदत्त वाडेकर, डॉ. पंचाक्षरी पुजारी, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. गोपाल चौधरी, अंकुश कडुसकर, भास्कर साळुंखे, डॉ. प्रतीक पाटील, विशाल कड, सरपंच महादेव बचुटे, किरण कड आदी उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


Media Ids : CHN22B03230

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top