स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध ऑनलाइन स्पर्धा-VDM21B0198 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध ऑनलाइन स्पर्धा-VDM21B0198
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध ऑनलाइन स्पर्धा-VDM21B0198

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध ऑनलाइन स्पर्धा-VDM21B0198

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २२ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात लोक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २२ ते २४ डिसेंबर दरम्यान ५ वी ते १२ वी गटासाठी निबंध स्पर्धा, १ ली ते ५ वी, ५ वी ते ११ वी व १२ वी ते खुल्या गटांसाठी चित्रकला स्पर्धा, खुल्या गटासाठी वक्तृत्व, जिंगल स्पर्धा व लघुपट शॉर्ट मूव्ही स्पर्धेचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धन, आपले वडगाव, हरित वडगाव, पंचतत्वांचे संरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती, हागणदारी मुक्त शहर, वृक्षारोपण, जलसंवर्धन, पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, शहर सुशोभीकरण, स्वच्छ सर्वेक्षण हे स्पर्धेचे विषय आहेत. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे दोन हजार रुपये, दीड हजार रुपये व एक हजार रुपये या प्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.