पेरणेफाटा येथील ज्ञानेश्वरीला सुवर्णपदक -KBM21B0207 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेरणेफाटा येथील ज्ञानेश्वरीला सुवर्णपदक -KBM21B0207
पेरणेफाटा येथील ज्ञानेश्वरीला सुवर्णपदक -KBM21B0207

पेरणेफाटा येथील ज्ञानेश्वरीला सुवर्णपदक -KBM21B0207

sakal_logo
By

केसनंद, ता. २२ : तेलंगणा येथे सरूरनगरमध्ये झालेल्या एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेत पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ज्ञानेश्वरी निकम हिने १४ वर्षेखालील गटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत पेरणेफाटा येथील महारुद्र मार्शल आर्टस या संस्थेच्या खेळाडूंनी एक सुवर्णपदक, २ रौप्यपदके व २ कास्यपदके पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली. विजेत्यांमध्ये सृष्टी ढमाले, वेदांती भगत, स्वरूप ढमाले व अर्बाज शेख यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना महारुद्र मार्शल आर्टस संस्थेच्या प्रशिक्षक पूजा ढमाले यांनी मार्गदर्शन केले.
--------------
02758