केसनंद येथील शेतकऱ्यांचे
‘महावितरण’समोर आंदोलन

केसनंद येथील शेतकऱ्यांचे ‘महावितरण’समोर आंदोलन

केसनंद, ता. ४ : केसनंद (ता. हवेली) परिसरातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केल्याने वाघोली येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकरी संघटना व केसनंद ग्रामस्थांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकरी व ग्रामस्थांनी आंदोलनास सुरुवात केल्यानंतर सामाजिक संघटना व केसनंद ग्रामपंचायतीने आंदोलनाला पाठिंबा दिला. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे बेकायदेशीर कनेक्शन बंद केल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. दरम्यान आंदोलनाची दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनेक्शन पुन्हा सुरु करण्याबाबत सूचना दिल्या.
‘वीज कनेक्शन बंद केल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा तातडीने सुरु करावा,’ अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप आणि दादा माने यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com