शिरूर-हवेलीत दोन्ही गटांकडून जल्लोष

शिरूर-हवेलीत दोन्ही गटांकडून जल्लोष

केसनंद, ता. ४ : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यात ‘अ’ वर्गात विजयी झालेले आमदार अशोक पवार व जिल्हा बँकेत विरोधी पॅनेलमध्ये ‘क’ वर्गात निवडून आलेले विरोधी पॅनेलचे एकमेव उमेदवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या दणदणीत विजयामुळे शिरूर-हवेलीत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून व गुलाल उधळून मोठा जल्लोष करण्यात आला.

निवडणुकीचा निकाल समजताच आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई गावी आणि सणसवाडी व शिरूरसह ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर, प्रदिप कंद यांच्या लोणीकंद गाव परिसरातही कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून व गुलाल उधळून घोषणा देत मोठा जल्लोष करण्यात आला. जिल्हा बँकेचा निकाल समजताच लोणीकंद हद्दीत तुळापूर फाटा येथे आमदार पवार व प्रदिप कंद या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या विजयाबद्दल चढाओढीने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. विजयानंतर लोणीकंद गावात आलेल्या प्रदिप कंद यांचे कार्यकर्त्यांनी जेसीबीतून गुलाल, भंडारा उधळत जल्लोषात स्वागत केले. ग्रामदैवत म्हसोबा देवाचे दर्शन घेऊन आभार सभाही घेतली. त्यानंतर गावातून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी विजयाच्या घोषणांनी आसमंत दणाणला.

शिरूर तालुक्याच्या आजवरच्या इतिहासात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी मला दिलेली विक्रमी मते हा मी आजवर सामान्यांसाठी केलेल्या कामाची जनतेने दिलेली पावतीच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा सामान्य जनतेचा विजय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासारखे सक्षम नेतृत्व जिल्हा बँकेला लाभल्यामुळे बँकेची होत असलेली प्रगती व नेतृत्वाच्या विश्वासामुळेच मतदारांनी आम्हाला निवडून दिले.
- अशोक पवार

पक्षीय मतभेद न ठेवता जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनआजवर केलेल्या केलेल्या विक्रमी विकासकामाची मतदारांनी दिलेली ही पावती असून, कार्यकर्त्यांचे व सर्व पक्षीय स्नेही जणांचे अपार कष्ट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळेच सात आमदारांबरोबर मीही जिल्हा बँकेत जाऊ शकलो व आता कोणतीही निवडणूक लढवण्याचा आत्मविश्वास आला आहे.
- प्रदिप कंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com