थापेवारवडी ग्रामस्थांचे उपोषण आंदोलन-GRD21B0235

Published on

सासवड शहर, ता. १५ : थापेवारवडी (ता. पुरंदर) येथील मुख्य रस्त्यावर खासगी मालकीच्या बेकायदेशीर कमानीचे काम सुरू असून, ते बंद करून कमान जमीनदोस्त करावी, या मागणीसाठी थापेवारवडी ग्रामपंचायतीचे सदस्य व भाजप कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सासवड (ता. पुरंदर) येथे पंचायत समितीसमोर हे उपोषण सुरू आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, थापेवारवडीचे सरपंच रूपाली संजय खवले, उपसरपंच नीलेश जगदाळे, गराड्याचे सरपंच नवनाथ गायकवाड, समीर तरवडे, नितीन जगदाळे, संजय रावडे, माजी सरपंच वर्षा खवले, सुनील जगदाळे, लहू जगदाळे, विष्णू जगदाळे, बाळासाहेब दुरकर, बापू घारे, संजय खवले, उत्तम खवले, संतोष तळेकर, हनुमंत खवले, सुरेश खवले, मुक्ताताई पवार, सुरेखा खवले, धोंडीबा खवले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com