पतसंस्थेच्या सभासदांचे हित जपणार : कुंजीर

पतसंस्थेच्या सभासदांचे हित जपणार : कुंजीर

सासवड शहर, ता. ४ : ''''पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना बरोबर घेऊन पारदर्शक कारभार करणार आहे. यामुळे सभासदांचे हित जपणार आहे,'''' असे प्रतिपादन पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती वैजयंता कुंजीर यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पतसंस्थेच्या सभागृहात कुंजीर, उपसभापती गोरक्षनाथ चव्हाण तर मानद सचिव सुधीर मेमाणे यांच्या बिनविरोध निवडी झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती बोलत होत्या.
निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनेलने योग्य नियोजन केल्यामुळेच विजय मिळाला आहे. सभासदांना सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित आहे व ज्या चुका पूर्वी झालेल्या आहेत. त्या सुधाराव्यात. यावेळी नव्यांना देखील संधी मिळेल, असे माजी सभापती व ज्येष्ठ शिक्षक नेते प्रदीप कुंजीर यांनी सांगितले.

या संस्थेतील सेवकांना देखील योग्य ती मदत केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यांना देखील पतसंस्थेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात येईल, असे परिवर्तन पॅनेलचे प्रमुख राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
सभासदांसाठी कर्जावरील व्याजदर १ अंकी करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. सभासदांचे हित जोपासा, संस्थेचे हित पहा, असे पॅनेल प्रमुख तानाजी फडतरे यांनी सांगितले.
यावेळी संचालक राजेंद्र कुंजीर, चंद्रकांत जगताप, संतोष कुंजीर, शरद पवार, दत्तात्रेय फडतरे, अनंता जाधव तसेच शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश लवांडे, विजय वाघमारे, सचिन बोरावके, प्रताप मेमाणे, भानुदास कुंभारकर, विठ्ठल गुरव, अरुण महाडीक, मनोहर तरडे, शरद कुंभार, विजय गायकवाड, गणेश मेमाणे, दत्तात्रेय गायकवाड, छाया कुंजीर, सुवासिनी पवार, उज्वला कुंजीर, स्वाती कटके उपस्थित होते.
..........................................
04261

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com