इंदापुरात ‘दूध प्या’ उपक्रमास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात ‘दूध प्या’ उपक्रमास प्रतिसाद
इंदापुरात ‘दूध प्या’ उपक्रमास प्रतिसाद

इंदापुरात ‘दूध प्या’ उपक्रमास प्रतिसाद

sakal_logo
By

इंदापूर, ता. २ ः महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघ शाखा इंदापूरच्या वतीने सलग बाराव्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी रात्री ‘दारू नको दूध प्या’ हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील रचना देशी गोसंवर्धन केंद्राच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजिदखान पठाण उपस्थित होते. प्रदीप गारटकर म्हणाले, बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवा पिढी घडवण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी विशाल बोंद्रे, नगरसेवक अमर गाडे, अतुल शेटे, जावेद शेख, मारुती मारकड, महादेव सोमवंशी, डॉ. संजय शिंदे, मल्हारी घाडगे,सचिन पवार, रवींद्र परबत, शरद झोळ आदी उपस्थित होते.
स्वागत डॉ. प्रताप कदम, तानाजी पांडुळे, विकास खिलारे, सचिन परबते यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले. आभार प्रशांत सिताप यांनी मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top