युवकाने रक्तदानाने केला नववर्षाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकाने रक्तदानाने केला नववर्षाचा प्रारंभ
युवकाने रक्तदानाने केला नववर्षाचा प्रारंभ

युवकाने रक्तदानाने केला नववर्षाचा प्रारंभ

sakal_logo
By

इंदापूर, ता. २ ः रांझणी (ता. माढा) येथील दत्तात्रेय भैरू जाधव (वय ३९) या युवकाने २१ वर्षांत ७५ वेळा रक्तदान केले आहे. नववर्षाचा प्रारंभ करताना त्यांनी इंदापुरात मुक्ताई ब्लड बँकेचे संचालक अविनाश ननवरे यांच्याकडे रक्तदान केले.
दत्तात्रेय जाधव यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाले असून ते वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करत आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी सातवेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. इंदापूर येथील डॉ. मिलिंद खाडे व त्यांच्या पत्नी डॉ. कल्पना खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम त्यांनी सुरू केले आहे. त्यांना इंदापूर येथील संजीवनी ट्रस्टचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांचे सहकार्य लाभले आहे. ४५ वयापर्यंत त्यांनी १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top