बलदोटा, रोमन, ननवरे वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलदोटा, रोमन, ननवरे वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या
बलदोटा, रोमन, ननवरे वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या

बलदोटा, रोमन, ननवरे वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या

sakal_logo
By

इंदापूर, ता. ९ ः कॉप्स विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या पलक बलदोटा या विद्यार्थिनीस ५ ते १४ वयोगट तर संजीवनी रोमन यांना १५ ते १७ वयोगटात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. २५ वर्ष पूर्ण खुल्या गटातून इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका वर्षा ननवरे यांना तृतीय पारितोषिक मिळाले.
महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी एकत्र येऊन महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम कशा बनू शकतात? या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२१ चे आयोजन कॉप्स संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केले होते. या स्पर्धेत राज्यातील २७० स्पर्धकांनी भाग घेतला. अंतिम फेरीत ७० स्पर्धकांनी उत्कृष्टरीत्या वक्तृत्व सादर केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भाजपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, कॉप्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदम बेग, उपाध्यक्ष आझम खान, संचालिका रूपाली बेग, इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशनचे संचालक प्रा. भूषण ओझर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्पर्धेसाठी प्रणोती शितोळे, ॲड दिलशाद मुजावर, भगवान मते, स्वाती शिंदे, शहनाज मणेर, डॉ. सचिन सादरे व सोनल गोडबोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्या ज्योती जगताप यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

५ ते १४ वयोगटात दिव्यांका करचे (प्रथम), श्रेया पाटील, अपेक्षा रहाणे, प्रणवी पाटील (द्वितीय), शरण्या निगडे व संस्कृती पानकडे (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. १५ ते १७ वयोगटात पूर्वा चौधरी (प्रथम), प्रांजल घोडके व खुशी मते (द्वितीय), समृद्धी हिरे व आर्शिन मन्सूरी (तृतीय) तर कोमल पाटील हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
१८ ते २५ वयोगटात साराह मोमीन, साईराज घाटपांडे (प्रथम), मंगेश म्हस्के, स्नेहल दळवी व इरा नेवसकर (द्वितीय), शिवानी इथापे, श्रेया काकडे (तृतीय), निकिता कुकरेजा व सुरमई मुखर्जी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
२५ वर्ष पूर्ण वयोगटात वैष्णवी लोखंडे (प्रथम), अर्चना येलमाटे (द्वितीय), अर्चना देबनाथ (तृतीय) तर कनक वासवानी, शारदा यादव व राखी गौड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top