इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा जैवविविधता उद्यान उपक्रम स्तुत्य - दादासाहेब कांबळे

इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा जैवविविधता उद्यान उपक्रम स्तुत्य - दादासाहेब कांबळे

इंदापूरचे जैवविविधता उद्यान
राज्यासाठी आदर्श : कांबळे
इंदापूर, ता. ११ : ‘‘इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा श्रमदान करून जैवविविधता उद्यान तयार करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींचे संवर्धन होत असून, हा इंदापूरचा सेल्फी पॉइंट बनला आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून, या उपक्रमाचा संपूर्ण राज्याने आदर्श घेणे गरजेचे आहे,’’ असे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
प्रांताधिकारी कांबळे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या जैवविविधता उद्यानाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्यान विभाग प्रमुख अशोक चिंचकर यांनी आयुर्वेदिक वनस्पती व त्यांच्या औषधी गुणधर्माची माहिती दिली. यावेळी नगरसेवक भरत शहा, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, सभा अधीक्षक गजानन पुंडे, सहायक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, वीज विभाग पर्यवेक्षक दीपक शिंदे, जवाहर बोरा, गोकूळ पलंगे व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com