
मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी प्रक्रीया सुरु
सासवड शहर, ता. २४ : पुरंदर तालुक्यातील आदर्श क्रांती संघटनेच्यावतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन १ मे २०२२ रोजी करण्याचे आले आहे.
गेल्या १६ वर्षांपासून सर्व समाजातील लोक या मोफत विवाह सोहळ्याचा लाभ घेत आहेत. यावर्षी आपणाकडील वधू-वरांचे विवाह या सोहळ्याच्या माध्यमातून करावेत, असे आवाहन संघटनेचे संस्थापक संजय ज्ञानोबा जगताप यांनी केले आहे.
या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल तसेच लग्नात येणाऱ्या सर्व व्यक्तींची भोजनाची व्यवस्था, भव्य अशी मिरवणूक अशा प्रकारची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विवाह नोंदणी सासवड व जेजुरी येथे चालू आहे. तसेच, शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्यास १०,००० रुपये दिले जातील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, उपाध्यक्ष विकास जगताप, सचिव राहुल इनामके, सहसचिव उमेश लांडगे, कार्याध्यक्ष सुनील जगताप यांनी दिली. विवाह नोंदणीसाठी संपर्क : ९८६०३३५६१९, ९७६३१२१९३५.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..