वीज बिलाच्या वसुलीला उसाच्या बिलातून विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज बिलाच्या वसुलीला 
उसाच्या बिलातून विरोध
वीज बिलाच्या वसुलीला उसाच्या बिलातून विरोध

वीज बिलाच्या वसुलीला उसाच्या बिलातून विरोध

sakal_logo
By

इंदापूर, ता. ३१ : शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुली करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आमचा तीव्र विरोध असून, या पद्धतीने वीज बिल वसुली शेतकऱ्यांवर अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून थकीत वीज बिलाची वसुली होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
याबाबत ते म्हणाले की, महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य असल्याने महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केलेली थकीत वीज बिलाची वसुली चुकीची आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाची शेतकऱ्याकडून सक्तीने वसुली करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. वास्तविक शेतकऱ्यांना विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. ती चुकीची बिले दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नेहमीच वापरलेल्या विजेची बिले भरलेली आहेत. जर शासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थकीत वीजबिल वसुलीचा तगादा लावला, तर राज्यामध्ये भाजपतर्फे आंदोलन केले जाईल.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top