मंचर येथे सुरक्षाविषयक मार्गदर्शन शिबिर-MAC21B0271

मंचर, ता. १४ : ‘‘येथील बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात धर्मवीर संभाजी नागरी सहकरी पतसंस्था व मंचर पोलिस ठाणे यांच्या वतीने गुरुवारी (ता. १६) दुपारी दोन ते संध्याकाळी चार या वेळेत सुरक्षाविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे,” अशी माहिती धर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम लोंढे यांनी दिली.
“शिबिराचे उद्‍घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते होणार असून शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, पोलिस निरिक्षक सतीश होडगर, सायबरतज्ञ मुकेश भांदरगे, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळूंज मार्गदर्शन करणार आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्व पतसंस्था, बँकांचे प्रतिनिधी यांनी शिबिराला उपस्थित राहावे,” असे आवाहन धर्मवीर पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील बाणखेले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com