अवसरीचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
अवसरीचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

अवसरीचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By

“येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त मिळणाऱ्या सेवा बंद करू नयेत. अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिवनेरी जम्बो कोविड सेंटर व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड सेंटर त्वरित सुरु करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.’’
याबाबत शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे व पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले म्हणाले, “जिल्हाधिकारी पुणे यांनी अवसरी खुर्द यथे दोन्ही कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशाची पायमल्ली तालुका स्तरावरील प्रशासनाने केलेली आहे. ही गंभीर बाब आहे. कोविड सेंटरसाठी करोडो रुपये खर्च झाला आहे. त्याचा लाभ रुग्णांना झाला पाहिजे. गेल्या आठवड्यात शिवसेनेने कोविड सेंटर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये. म्हणूनच अवसरीची कोविड सेंटर सुरु करण्यास चालढकल केली जात आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालय कोविड केल्यामुळे प्रसूती व अन्य आजार असलेल्या रुग्णांचे हाल सुरु आहेत. या संदर्भात प्रशासनाने योग्य कार्यवाही न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल.”

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top