जुन्नर नगरपरिषदेचे काम आजपासून प्रशासक पाहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर नगरपरिषदेचे काम आजपासून प्रशासक पाहणार
जुन्नर नगरपरिषदेचे काम आजपासून प्रशासक पाहणार

जुन्नर नगरपरिषदेचे काम आजपासून प्रशासक पाहणार

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ ः जुन्नर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल रविवारी (ता. ९) संपल्याने सोमवार (ता. १०) पासून नगर परिषदेचा कारभार प्रशासक पाहणार आहेत. उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोविड-१९ च्या संक्रमणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर पार पाडणे शक्य झाले नाही. मुदत संपलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी आणखी काही काळ लागणार असल्याने प्रशासक नियुक्ती करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top