जुन्नर बंद घरातून चार लाख ९० हजार ऐवजाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर बंद घरातून चार लाख ९० हजार ऐवजाची चोरी
जुन्नर बंद घरातून चार लाख ९० हजार ऐवजाची चोरी

जुन्नर बंद घरातून चार लाख ९० हजार ऐवजाची चोरी

sakal_logo
By

जुन्नर, ता. १३ : गवारवाडी-वैष्णवधाम (ता. जुन्नर) येथे झालेल्या घरफोडीच्या घटनेत रोख रकमेसह चार लाख ९० हजारांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
याबाबतची फिर्याद विमल बाळू गवारी यांनी दिली आहे. गवारवाडी येथे वस्तीपासून दूर एकाकी असलेल्या घरात कोणी नाही असे पाहून छताची कौले उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटे, सोफा, बेडमध्ये शोधाशोध करून पाच तोळे वजनाचे सोने यामध्ये मणी मंगळसूत्र, दीड तोळे वजनाचा लक्ष्मी हार, सात ग्रॅमची सोन्याची नथ, नऊ ग्रॅम वजनाचे तीन कर्णफुलाचे जोड व रोख रक्कम ९० हजार रुपये असा एकूण चार लाख ९० हजारांचा ऐवज लंपास केला. बुधवार घरातील सर्व परगावी गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने ही चोरी केली. गवारी गुरुवारी (ता.१३) रोजी घरी आल्यानंतर त्यांना चोरीची घटना समजली अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top