पवित्र पोर्टल तातडीने बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवित्र पोर्टल तातडीने बंद करा
पवित्र पोर्टल तातडीने बंद करा

पवित्र पोर्टल तातडीने बंद करा

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १२ : ‘‘शिक्षण क्षेत्रासाठी सुरू केलेले पवित्र पोर्टल हे त्यातील गोंधळामुळे अपवित्र पोर्टल झाले आहे. त्यामुळे पवित्र अशा शिक्षणक्षेत्रातीले हे पोर्टल तातडीने बंद करावे. तसेच, शाळा आणि संस्थाचालकांना येणाऱ्या समस्यांचे शासनाने निराकरण करावे,’’ अशी मागणी संस्थाचालक शिक्षण महामंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केली.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे खासगी, विनाअनुदानित, अनुदानित शिक्षण संस्था चालकांच्या सहविचार बैठकीत ते बोलत होते. शैक्षणिक संस्थांच्या विविध समस्यांची माहिती करून घेण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी कोलते म्हणाले, ‘‘पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात तत्कालीन युती शासनाने अपवित्र पोर्टल आणले. त्यात अनेक त्रुटी असून, त्यामुळे शिक्षण संस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. या त्रुटी दूर केल्याशिवाय संस्था नीट चालू शकणार नाही. या पवित्र पोर्टलच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे.’’
दरम्यान पवित्र पोर्टल रद्द करणे, शासनाकडून १२ टक्के वेतनेतर अनुदान मिळणे, मालमत्ता करातून शिक्षणसंस्थांना सूट देणे, पोर्टलच्या माध्यमातून शिक्षणकांच्या नेमणुका आणि बदल्या रद्द करणे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या बैठकीला महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन, विश्वस्त महादेवराव कांचन, संभाजीराव कांचन, पुणे जिल्हा संस्था चालक संस्थेचे संचालक शंकराव भूमकर, गुरुमुख नारंग, सचिव घोगरे, वढू येथील सैनिकी स्कूलचे संस्थापक दीपक पायगुडे, पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, रामदास चौधरी, रंगनाथ कड, शिंदवणे येथील गुरुदत्त जनसेवा विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा जनार्दन महाडीक, सोनबा चौधरी, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बबनराव दिवेकर आदी उपस्थित होते‌‌.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top