संतोष जगताप खून प्रकरणाचा मास्टरमाईंड विष्णू जाधव असल्याचा संशय

संतोष जगताप खून प्रकरणाचा मास्टरमाईंड विष्णू जाधव असल्याचा संशय

उरुळी कांचन, ता. १४ : वाळू व्यावसायिक संतोष संपत जगताप याच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अनिल पोपट सोनवणे (वय ३४, रा. राहू, ता. दौंड) याला लोणी काळभोर पोलिसांनी नुकतेच अटक केली. अनिल सोनवणे याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान संतोष जगताप खून प्रकरणाचा मास्टरमाईंड विष्णू जाधवच असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.

उरुळी कांचन येथील गुंड भाऊ लोंढे व त्याचा भाऊ अप्पा लोंढे या दोघांच्या हत्येप्रकरणी विष्णू जाधव हा मुख्य संशयित आरोपी असून संतोष जगताप हत्या प्रकरणातील तोच मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच उमेश सोनवणे याने विष्णू जाधव याच्या मार्फत सुपारी देऊन संतोष जगताप याची हत्या केल्याचा संशयही पोलिसांना आहे.

लोणी काळभोर परिसरात गुन्हेगारी कृत्य करून दहशत पसरविणाऱ्या विष्णू जाधव व आदलिंगे टोळीच्या म्होरक्यासह ७ जणांवर पोलिस आयुक्तांनी मोकाची कारवाई केली होती. तर अनिल सोनवणे याच्या अटकेमुळे संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे २२ ऑक्टोंबर रोजी संतोष संपत जगताप (रा. राहू, ता. दौंड) सोनाई हॉटेलमध्ये संतोष जगताप जेवणासाठी थांबला असता त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता.

दरम्यान, टोळीप्रमुख महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २८ रा. जुनी तांबेवस्ती, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली), स्वागत बापू खैरे (वय-२५, रा. उरुळी कांचन) (मयत टोळी सदस्य), पवन ऊर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २९, रा. दत्तवाडी भवरापुर रोड, उरुळी कांचन), उमेश सोपान सोनवणे, (वय-३५, रा. राहू, ता. दौंड), अभिजित अर्जुन यादव, (वय-२२ रा. मेडद, ता. बारामती), आकाश ऊर्फ बाळू जगन्नाथ वाघमोडे, (वय २८, रा. पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापुर), महेश भाऊसाहेब सोनवणे, (वय २८, रा. भांडवाडी वस्ती, राहु, ता. दौड) असे मोकाची कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com