ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला ‘ऑक्सफर्ड’चे व्यासपीठ-PNE21R0462 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला ‘ऑक्सफर्ड’चे व्यासपीठ-PNE21R0462
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला ‘ऑक्सफर्ड’चे व्यासपीठ-PNE21R0462

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला ‘ऑक्सफर्ड’चे व्यासपीठ-PNE21R0462

sakal_logo
By

बारामती, ता. २५ : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाने बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
सद्यःस्थितीत ‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘इंटेल’सारख्या आघाडीच्या कंपन्या ‘ऑक्सफोर्ड’सोबत यात सहभागी आहेत. नव्याने या समूह सोबत ट्रस्ट सहभागी होत असल्याने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संशोधनही जगात पोहोचणार आहे. ट्रस्टच्या मदतीने कृषी विषयक सादरीकरण ‘ऑक्सफर्ड’मध्ये करणार आहे. डॉ. सारंग नेरकर (टोरांटो विद्यापीठातील माजी शास्त्रज्ञ) आणि नीलेश नलावडे (नेदरलँड्समधील बॉखनिंगन विद्यापीठात शिक्षणप्राप्त) हे ऑक्सफर्ड विद्यापीठातील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : क्लाऊड आणि एज इम्प्लीमेंटेशन्स’ या अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्या संस्थेतील संशोधनाचे सादरीकरण करणार आहेत. संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले.

ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रोत्साहनाने नुकतेच अटल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरची स्थापना बारामतीत केली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांसाठी कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून केला जात आहे. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता, वेअरेबल कॉम्प्युटिंग आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी आधारित स्मार्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर संशोधन चालू आहे. याचा उपयोग कृषी आणि अन्न उद्योगातील विविध समस्यांवर उपाय म्हणून केला जाऊ शकतो. (उदा. स्वयंचलित रिअल-टाइम कीड, रोग आणि शेतातील पिकांमध्ये दहा ते पंधरा दिवस अगोदर कमतरता ओळखणे व त्यावर आधारित मार्गदर्शन करणे.)

संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमाचे संचालक डॉ. अजित जावकर यांची भेट घेतली. त्यावेळी प्रतापराव पवार यांनी वरील संशोधनाची माहिती त्यांना दिली. त्यानंतर ऑक्सफर्डमधील तज्ज्ञ समितीने डॉ. सारंग रकर आणि नलावडे यांना त्यांचे संशोधन कार्य सादर करण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर कृषी क्षेत्रात वाढविण्यासाठी जागतिक स्तरावरील विविध कंपन्या, संस्था यांचे एकत्रीकरण करण्यात रस असल्याचे मत डॉ. जावकर यांनी नोंदवले. अशा समस्यांवरील संशोधनासाठी टॅलॅट आकर्षित करून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सोबत दीर्घकालीन भागीदारी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रात एकाच ठिकाणी ऑगमेंटेड रिअॅलिटी, ड्रोन वापर, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, क्वाटंम कॉम्प्युटींग, सेन्सर्स इत्यादी तंत्रज्ञानावर एकत्रित संशोधन करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला.

ऑक्सफर्डसोबतच्या सहकार्याची संभाव्य भविष्यातील दिशा लक्षात घेताना भविष्यात याला अधिक व्यापक स्वरूप येण्यासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सचा प्रकल्प विकसित करणार आहोत. नलावडे व डॉ. नेरकर यांचे या प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो.
- शरद पवार, अध्यक्ष, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती

नव आविष्काराचे बीज युवापिढीच्या हातून महाराष्ट्राच्या मातीत रुजत असून, त्याची दखल जागतिक दर्जाचे ऑक्सफर्ड विद्यापीठ घेत आहे व त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचे काम अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत केले जात आहे, याचा आपल्याला अभिमान वाटतो.
- प्रतापराव पवार, विश्वस्त, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..