ट्रॅक्टरच्या धडकेत दांपत्याचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या धडकेत दांपत्याचा मृत्यू

वालचंदनगर, ता. ४ ः जंक्शन (ता. इंदापूर) जवळ जंक्शन-वालचंदनगर रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॉलीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
या अपघातामध्ये घन:श्याम देवकीनंदन भाटिया (वय ५३) व आशा घन:श्याम भाटिया (वय ४६) वर्ष या पती-पत्नीचा मृत्यू झाला.
याप्रकरणी यतीन राजकुमार भाटिया (वय ३५) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी तीनच्या सुमारास भाटिया हे वालचंदनगर गेले होते. वालचंदनगरहून जंक्शनकडे परतत असताना जंक्शनजवळील नऊदारे येथे देवीच्या मंदिरासमोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर -ट्रॉलीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com