अवैध सावकारीप्रकरणी दोघांना जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध सावकारीप्रकरणी दोघांना जामीन मंजूर
अवैध सावकारीप्रकरणी दोघांना जामीन मंजूर

अवैध सावकारीप्रकरणी दोघांना जामीन मंजूर

sakal_logo
By

पुणे, ता. १ : व्यावसायासाठी दिलेले पाच कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज परत केल्यानंतरही आणखी पावणे पाच कोटी रुपये मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी जामीन मंजूर केला. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७, रा. औंध) आणि अनिकेत रमेश हजारे (वय ३८, रा. दापोडी) अशी त्या दोघांची नावे आहेत. हजारे याच्या वतीने ॲड. रविशंकर बिभीषण ठोंबरे, ॲड. श्रेया सावंत आणि ॲड. चैतन्य जोशी यांनी काम पाहिले. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर या कालावधीत घडला. याबाबत बालेवाडी येथील ३५ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top