पडवी येथे घरफोडीत दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडवी येथे घरफोडीत दागिन्यांची चोरी
पडवी येथे घरफोडीत दागिन्यांची चोरी

पडवी येथे घरफोडीत दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

वरवंड, ता. १ : पडवी (ता. दौंड) येथे लोकवस्तीत भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून २४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. पडवी येथील बोरवनवस्तीमध्ये रामभाऊ विठोबा शितोळे यांचे राहते घर आहे. घराच्या आजूबाजूलाही इतर लोकवस्ती आहे. शितोळे हे शनिवारी दुपारी बारा वाजता घराच्या दरवाजाला कुलूप लावून कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले. दुपारी तीन वाजता ते घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा सेफ्टी व मुख्य दरवाजा उघडा दिसला. तसेच, कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. त्यांनी घाईघाईने घरात प्रवेश करून पाहणी केली. त्यावेळी घरातील कपाटातील साहित्य इतरत्र पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच, सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुमारे चोवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top