पर्यटकांच्या गर्दीमुळे टोलनाक्यांवर कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांच्या गर्दीमुळे टोलनाक्यांवर कोंडी
पर्यटकांच्या गर्दीमुळे टोलनाक्यांवर कोंडी

पर्यटकांच्या गर्दीमुळे टोलनाक्यांवर कोंडी

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ३ ः थर्टी फस्टसाठी येथे आलेले पर्यटक व गावाकडे गेलेले चाकरमाने परतीच्या प्रवासाला निघाल्याने दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सुटीच्या निमित्ताने मुंबईहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी मावळात आले होते. त्यातच सलग सुट्या आल्याने अनेक चाकरमाने आपापल्या गावाकडे गेले होते. सुटी संपल्यानंतर पर्यटक व चाकरमाने एकाच वेळी आज परतीच्या प्रवासाला मुंबईकडे निघाले होते. त्यामुळे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी सोमाटणे टोलनाका व उर्से टोलनाका येथे टोल भरण्यासाठी मुंबई लेनवर वाहनांच्या दोन किलोमीटर अंतर रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहनांची गर्दी कायम होती. टोल व्यावस्थापन व महामार्ग पोलिसांनी टोल बुथवर पर्यायी मार्गिका उपलब्ध केल्याने काही प्रमाणात गर्दी कमी झाली.

१८३४

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top