भिगवण येथे उलगडला सावित्रीबाईंचा जीवनपट

भिगवण येथे उलगडला सावित्रीबाईंचा जीवनपट

भिगवण, ता. ३ : येथील कोंडिराम सदाशिव क्षीरसागर विद्यालय व कला महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी वक्तृत्व, वेषभूषा, काव्यवाचन आदींचे आयोजन करण्यात आले होते.
येथील क्षीरसागर विद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, प्राचार्य तुषार क्षीरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन अविनाश गायकवाड, विशाल तेली, नसरील शेख, अर्चना निंबाळकर आदींनी केले. प्रास्ताविक पद्मिनी गायकवाड यांनी केले. आभार नवनाथ सावंत यांनी मानले.
येथील कला महाविद्यालयामध्ये वक्तृत्वचे आयोजन केले होते. अश्विनी शिंदे, यास्मीन पठाण, प्रज्ञा देवकाते, सुप्रिया ढवळे, भाग्यश्री बंडगर यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उभा केला.
यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ. भास्कर गटकुळ, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. संदीप साठे, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. पद्माकर गाडेकर, प्रा. धनाजी मत्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com