विनामास्क फिरणाऱ्यांवर भोर पोलिसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनामास्क फिरणाऱ्यांवर 
भोर पोलिसांची कारवाई
विनामास्क फिरणाऱ्यांवर भोर पोलिसांची कारवाई

विनामास्क फिरणाऱ्यांवर भोर पोलिसांची कारवाई

sakal_logo
By

भोर, ता. ६ : विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि रोडरोमिओंवर भोर पोलिसांनी कारवाई करण्यात सुरुवात केली. ११ रोडरोमिओ आणि २५ विनामास्क फिरणाऱ्यांकडून एकूण २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु केली असून पुढील काळात ती सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी गस्त पथकाने शाळा महाविद्यालयांसमोरील मार्गावर रोडरोमिओंविरोधात कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक सोनाली दुरंदे, पोलिस हवालदार सीमा घुले, वर्षा नाईक, अशोक खुटवड, शिवाजी काटे व बाळासाहेब नवले आदींचा या पथकात समावेश होता. त्यांच्याकडून १४ हजार रुपये दंड वसूल केला.
पोलिसांना पाहून पळून गेलेल्या दुचाकींवर ऑनलाइन पद्धतीने दंड आकारण्यात आला. गुरुवारी शहर परिसरात विनामास्क फिरणाऱ्या २५ दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण ८ हजार रुपयांचा दंड वसूल केले. पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बळिराम सांगळे, राहुल साबळे, पोलिस हवालदार विकास लगस, अविनाश निगडे, शौकत शेख, उद्धव गोळे, अमोल मुऱ्हे, दत्तात्रेय खेंगरे आदींनी ही कारवाई केली.

kik०६p१-police
E22S33574

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top