वागदरवाडी येथे ४०५० महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

वागदरवाडी येथे ४०५० महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

Published on

वाल्हे, ता. ६ : वागदरवाडी (ता. पुरंदर) येथे पुण्यातील उदयकाळ फाउंडेशन व पॅड स्कॉड यांच्यावतीने पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भागातील ३६ केंद्रातील ४०५० किशोरवयीन मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले, अशी माहिती अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता भुजबळ यांनी सांगितले.
वागदरवाडीच्या सरपंच उषा पवार यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमिला पवार, सुजाता पवार, पल्लवी पवार, वर्षा पवार, राणी पवार, दीपाली कदम, आशा पवार, प्रियांका पिसाळ आदी महिला उपस्थित होत्या. महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणे ही काळाची गरज असून, अशा प्रकारचा उपक्रम परिसरामध्ये प्रथमच सुरू करण्यात आला आहे. किशोरवयीन मुली व महिलांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचे सरपंच उषा पवार यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका उषा पवार यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com