
अनेकांशी संबंध ठेवण्यास पतीची पत्नीला जबरदस्ती -BMT21B0983
बारामती, ता. १५ : पतीने आपल्या पत्नीला जबरदस्तीने सात ते आठ जणांची शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी संबंधित पतीसह अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांविरोधात बलात्काराचा, तर फिर्यादीच्या पती विरोधात तिला जबरदस्तीने चुकीचे कृत्य करायला भाग पाडण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सन २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीमध्ये ही घटना घडल्याची फिर्याद संबंधित महिलेने दिली आहे. तिचा पती लैंगिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले असून, तिने इतरांशी संबंध ठेवावे, यासाठी पतीकडून वारंवार दबाव टाकला जात होता. पीडितेच्या मोबाईलवरून संबंधित लोकांना घरी बोलावून त्यांना संबंध ठेवायला तो भाग पाडत होता. पत्नीने या गोष्टीसाठी विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती, असेही फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, ९ डिसेंबर रोजी बारामती शहर पोलिस ठाण्यात हा अतिशय संवेदनशील गुन्हा दाखल झाल्यानंतरदेखील पोलिसांनी ‘आरोपींना अटक केलेले नाहीत,’ या सबबीखाली माध्यमांपासून माहिती दडवून ठेवली. त्यामुळे याप्रकरणी नेमका पोलिसांचा हेतू काय होता, याबाबत चर्चा सुरू आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..