अजित पवार यांनी टाळली गर्दी

अजित पवार यांनी टाळली गर्दी

बारामती, ता. २ ः कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. २) आपल्या कार्यक्रमात अचानक बदल केले. आपल्या कार्यक्रमाला गर्दी होईल या शक्यतेने त्यांनी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रम पार पाडला. यानिमित्ताने पवार यांनी आयोजकांचा आग्रह न मोडता निर्बंधांचे पालन करणे शक्य असल्याचा संदेश दिला.

बारामतीतील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना पन्नासपेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीवर बंधने आणली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्रमाला गर्दी होईल या शक्यतेने अजित पवार तासभर अगोदरच कार्यक्रम स्थळी पोहोचले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हा कार्यक्रम केला. औपचारिकता बाजूला ठेवत डॉ. आशिष जळक यांच्या स्नेहभावामुळेच कार्यक्रमाला आल्याचे सांगून त्यांनी जळक कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
त्याचबरोबरच लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच नियमांचे पालन करायला हवे, असे आवर्जून सांगितले. सकाळीच अजित पवार यांनी शासकीय निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या कार्यक्रमांना गर्दी होणार असेल तर जाणारच नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र स्थानिकांच्या आग्रहामुळे अजित पवार यांनी मध्यम मार्ग काढत लोक जमा होण्यापूर्वीच कार्यक्रमस्थळ गाठून कार्यक्रम पार पाडून ते झटपट निघून जाण्याचा मार्ग अवलंबला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com