बारामती तालुक्यातील शिक्षिकांचा गौरव
बारामती, ता. ४ : ''''सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करून बारामती तालुक्यातील शिक्षिकांचा गौरव करण्यात आला.
बारामती तालुक्यातील अलका खोमणे, प्रतिभा कुतवळ, शारदा फलके, अंबिका बोरावके, स्वाती चव्हाण, मनीषा खोरे, मंगल भुसे, शर्मिला देशमुख, सुनंदा चांदगुडे, मनीषा खोमणे, सुरेखा क्षीरसागर, पूनम ननावरे, शहना इनामदार, उज्ज्वला बोरावके, छाया नलावडे, सारिका टिळेकर, अर्चना भापकर, संगीता जगताप विद्या खोमणे, वैशाली कांबळे, जयश्री पाटील, राणी मोकाशी, गीतांजली देवकर, कांचन रणपिसे, रूपाली सत्रे, प्रियांका कांबळे, संगीता लकडे, सुवर्णा कुतवळ, रूपाली भापकर, वर्षा मोहिते,स्वाती भुरे, प्रिया भोसले, सुनीता बोरावके, संध्याराणी पोळ, स्नेहलता कांबळे, पार्वती खटके, अलका कुदळे, मोनिका गिरमे, योगिता भोंग, योगिता झगडे, कार्तिकी टिळेकर, इंदुमती गायकवाड, वैशाली माळी, अलका रसाळ या महिला शिक्षकांचा ''आदर्श शिक्षिका पुरस्कार'' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणप्रसंगी बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, पंचायत समिती सदस्य शारदा खराडे, जिल्हा सरचिटणीस विजया खटके आदी उपस्थित होत्या.
दरम्यान, वयाच्या १८ व्या वर्षी दक्षिणआफ्रिका येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळवलेल्या अभिषेक ननवरे याचा सन्मान करण्यात आला. यावेळी योगशिक्षिका कमल ननवरे यांनी महिलांना योगाबाबत मार्गदर्शन केले.
''शिक्षिका समाजव्यवस्थाचा कणा आहेत, समाज घडण्यासाठी महिला शिक्षकांचे योगदान खूप मोलाचे आहे. या योगदानास प्रेरणा देण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा वनिता बनकर यांनी सांगितले. मंडळाच्या अध्यक्षा पायल नेवसे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदस्या मंगल बोरावके, शोभा बनकर, कमल हिंगणे, विजया बनकर, महात्मा फुले ट्रस्टचे नीलेश टिळेकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सुवर्णा बनकर यांनी केले, पूनम पिसे यांनी आभार मानले.
...........................
04191
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.