बारामती बॅंकेचा विस्तार करणार : सातव
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आई प्रतिष्ठानकडून सत्कार

बारामती बॅंकेचा विस्तार करणार : सातव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आई प्रतिष्ठानकडून सत्कार

बारामती, ता. ५ : ‘‘आगामी काळात बारामती बँकेचा अधिक विस्तार करत बँकेला मल्टीस्टेट व शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ अशी ग्वाही बारामती बँकेचे नूतन अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.

आई प्रतिष्ठानच्यावतीने बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातव यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. सुहासिनी सातव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. नगरसेवक नवनाथ बल्लाळ, सविता जाधव, संतोष जगताप, बबलू देशमुख, सिद्धनाथ भोकरे, अल्ताफ सय्यद, ऋतुराज काळे, नीलेश इंगुले, दीपक मलगुंडे, आबा मोकाशी, राकेश वाल्मीकी, सागर देशखैरे, नीलेश पलंगे, अनिल कदम, दीपराज कदम, नीलेश धालपे, शुभम अहिवळे, पांडुरंग चौधर, मनोज पटेल आदी या वेळी उपस्थित होते.

बारामती हिंदू-कोल्हाटी समाजासह अन्य संस्थांच्यावतीने या वेळी सातव यांचा सत्कार करण्यात आला. सचिन सातव म्हणाले, ‘‘पवार कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी योग्य रित्या पार पाडल्यानेच बारामती बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यात बॅंकेच्या शाखा आहेत. बॅंकेचा विस्तार केला जाईल. गुजरातपर्यंत बारामती बॅंक पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.’’
नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रतिष्ठानचे नाना घाडगे, नागेश कासार, रोहन माघाडे मंगल पवार, रफिक शेख, विशाल पाटील, नीलेश शेंडगे, राजू शेख, धीरज ढवाण आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. अनिल सावळे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com